आयुर्वेदिक मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

आयुर्वेदिक मसाज पार्लरच्या 
नावाखाली वेश्याव्यवसाय
Published on: 

पुणे, ता. २८ : वडगाव बुद्रूक परिसरातील एका निवासी इमारतीत ‘सोहम आयुर्वेदिक उपचार केंद्र’ या मसाज पार्लरवर नऱ्हे पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलांची सुटका केली. मसाज पार्लरच्या आडोशाने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महादेवी विकास चौगुले (वय ४२) आणि तिचा पती विकास शंकर चौगुले (वय ५०, दोघे रा. शिवाजीनगर गावठाण) या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. २७) रात्री पावणेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिस हवालदार स्वप्नील सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रूक येथील एका इमारतीमधील सदनिकेत ‘सोहम आयुर्वेदिक उपचार केंद्र’ सुरू होते. या केंद्रात मसाज पार्लरच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्य चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल रात्री तेथे बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला.
आरोपी पती-पत्नीने पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. निवासी भागात अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर हे आरोपी स्वतःची उपजीविका भागवत होते. या छाप्यानंतर गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com