Pune
Punesakal

Pune : एनआयबीएम क्लाऊड -९ येथील रस्त्याचे उद्घाटन,आ. तुपे म्हणतात, "ही तर लोकप्रतिनिधींची जबाबदारीच ! "

माजी नगरसेविका नंदा लोणकर आणि नारायण लोणकर यांनी वन खात्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून हा रस्ता खुला करण्यात आला आहे.
Published on

Pune - नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. एनआयबीएम-शहराला जोडणाऱ्या रस्त्याची १५ ते २० फूट खोदाई करून काँक्रिटीकरण करत हा रस्ता पूर्ण केला आहे.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण दूर झाली असल्याचे मत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे-पाटील यांनी म्हटले. एनआयबीएम येथील क्लाऊड -९ आनंदवन रस्त्याचे उद्घाटन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

Pune
Pune: पुणेकरांना दिलासा! झोपडीधारकांना अडीच लाखांत मिळणार घर; २०१० ते २०११ पर्यंतच्या रहिवाशांना लाभ

माजी नगरसेविका नंदा लोणकर आणि नारायण लोणकर यांनी वन खात्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून हा रस्ता खुला करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, साधना बँकेचे चेअरमन सुरेश घुले, माजी नगरसेवक फारुख इनामदार, संजय लोणकर, कलेश्वर घुले,

Pune
Mumbai : कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावलं; शिवसेनेकडून कारवाईचा मागणी

बापू मुलानी, युवराज लोणकर, जुहेब काझी, मोहम्मद्दीन खान, बॉबी सहानी, गुरविंदरसिंग राजपाल, भोलासिंग अरोरा, बापू रोकडे, मनोज घुले, प्रशांत कुमार, विश्वनाथ लोणकर, योगेश फाळके, उमेश सोनी, सचिन कापरे उपस्थित होते. जगताप म्हणाले, 'नागरिकांच्या समस्या समजून घेऊन, त्या सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न असून कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून नागरिकांच्या हिताचे काम करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com