पुणे: वाढीव आणि प्रस्तावित पदावरील शिक्षकांचे बेमुदत उपोषण

राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव आणि प्रस्तावित पदावरील विनावेतन शिक्षकांनी मध्यवर्ती इमारत येथील शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
PUNE
PUNE SAKAL

पुणे : राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव आणि प्रस्तावित पदावरील विनावेतन शिक्षकांनी मध्यवर्ती इमारत येथील शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण एक हजार २९८ वाढीव पदांवरील शिक्षक २००३ पासून विनावेतन काम करत आहेत. प्रस्तावित व वाढीव पदांना शासनाने तत्काळ मंजुरी द्यावी, अशी उपोषणकर्त्या शिक्षकांची मागणी आहे.

PUNE
सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण वार्षिक सभांना मुदतवाढ?

‘‘वेतन नसल्यामुळे शिक्षकांची अवस्था बिकट झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ सुरू आहे. काही शिक्षक पगाराविना सेवानिवृत्त झालेले आहेत. याबाबत सरकारने त्वरित वेतनाबाबत निर्णय घ्यावा, असे कृती समितीच्या सदस्या सुवर्णा यादव यांनी सांगितले. याप्रसंगी दयानंद तेऊरवाडकर, सचिन गायकवाड, सुधाकर वांद्रे, छाया खंडाईत, मयूरी जाधव आदी उपस्थित होते. ‘शिक्षण विभागाकडून वारंवार माहिती मागवली जाते. परंतु त्यात त्रुटी काढून संबंधित कागदपत्रे नामंजूर केली जातात. परिणामी वारंवार हेलपाटे मारावे लागतात,’ असे विजया धुमाळ-कदम यांनी सांगितले.

वाढीव पदावरील शिक्षकांच्या मागण्या :

- वाढीव पदांची माहिती परिपूर्णरित्या संचालक कार्यालयाने त्वरित शासनाकडे पाठवावी.

- २००३ ते २०१९ या काळातील वाढीव पदांना नियुक्तीपासून आर्थिक तरतूद त्वरित मंजुरी देणे.

- शिक्षकांचे वेतन विनाअट सुरू करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com