Measures Taken by Pune Bench for Efficient Case Management
पुणे : राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या द्वितीय अपील आणि तक्रारींच्या निपटाऱ्यात २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये तक्रारींच्या निकाली काढण्याचे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले, तर द्वितीय अपिलाची प्रलंबितता ३७ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा भार निम्म्याहून कमी करण्यात आयोगाला यश मिळाले आहे.