

Katraj Ghat Accident Risk
esakal
कात्रज: सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज घाटात अनेक ठिकाणच्या संरक्षक भिंती पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत असून, गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, संबंधित विभागाकडून केवळ पाहणी केली गेली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पावसाळा तोंडावर आला असताना घाटातील ही धोकादायक परिस्थिती गंभीर बनली आहे. मुसळधार पावसामुळे ढासळलेल्या भागात भूस्खलन किंवा वाहन दरीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.