esakal | Pune: इन्सा‌ टीचर ॲवार्ड प्राध्यापक डॉ. विद्या अवसरे यांना जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

प्राध्यापक डॉ. विद्या अवसरे

पुणे : इन्सा‌ टीचर ॲवार्ड प्राध्यापक डॉ. विद्या अवसरे यांना जाहीर

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : दिल्लीतील भारतीय‌ राष्ट्रीय विज्ञान अकादमीतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा इन्सा‌ टीचर ॲवार्ड पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील रसायनशास्राच्या प्राध्यापक डॉ. विद्या अवसरे यांना जाहीर झाला आहे. अवसरे यांच्यासह मुंबईतील आणखी दोन प्राध्यापकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

इंडियन नॅशनल सायन्स अकादमीतर्फे विज्ञान अध्यापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. रोख 50 हजार रुपये आणि पुस्तकांसाठी 20 हजार रुपयांचा निधी असे या पुरस्कारचे स्वरुप आहे. देशातील पंधरा शिक्षकांना डिसेंबर महिन्यात दिल्लीत हा सन्मान दिला जाणार आहे. मुंबईच्या सोफिया महाविद्यालयातील प्राणीशास्र विभागातील प्रा. रोशन डिसुझा आणि आयआयटी मुंबईतील प्रा. संतोष घारपुरे यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हेही वाचा: तत्वज्ञानाचे व्यावहारिक आचरण आवश्यक : भगतसिंह कोश्यारी

अवसरे यांचे शालेय शिक्षण सासवड येथे झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यानी एमएस्सी केले. आयआयटी मुंबईमध्ये त्यांनी पीएचडी केली. आता त्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात अध्यापन करीत आहे. त्या हरियाणातील अशोका विद्यापीठाच्या अभ्यागत प्राध्यापकही आहेत. विद्यार्थ्यांनी विशेषत: विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण पूर्ण करावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना विज्ञान विषयाकडे आकर्षित करण्याबरोबरच अध्यापनात कौशल्यपूर्ण प्रयोग करणे, संशोधन करणे, त्यांच्या अशा कामांची दखल भारतील राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून घेण्यात आली.

loading image
go to top