Pune : महापालिकेतील साडे सातशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

महापालिकेमध्ये एकाच खात्यात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी पुर्ण केलेल्या 2 व 3 संवर्गातील प्रशासन अधिकारी, उपअधिक्षक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता या पदांवरील सेवकांची बदली महापालिकेच्या मंजुर धोरणानुसार खात्याच्या एकूण मंजुर पदांच्या 20 टक्के मर्यादेत करण्यात आल्या.
pmc
pmcsakal

पुणे - महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया मंगळवारी पुर्ण झाली. त्यानुसार, दोन व तीन संवर्गातील सुमारे साडे सातशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्थापत्या, यांत्रिकी, विद्युत, शिक्षण अशा विविध विभागांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहे.

महापालिकेमध्ये एकाच खात्यात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी पुर्ण केलेल्या 2 व 3 संवर्गातील प्रशासन अधिकारी, उपअधिक्षक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता या पदांवरील सेवकांची बदली महापालिकेच्या मंजुर धोरणानुसार खात्याच्या एकूण मंजुर पदांच्या 20 टक्के मर्यादेत करण्यात आल्या.

pmc
Mumbai Municipal : ब्रिटीशकालीन दगडांचे जतन व पुनर्वापरासाठी पालिकेचा पुढाकार

याबरोबरच लेखन संवर्गातील उपअधिक्षक, वरिष्ठ लिपीक, अभियांत्रिकी वर्गातील शाखा अभियंता या पदांच्या पदस्थापना करण्यात आली. महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 12 एप्रिल रोजी अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) आणि सोमवारी (ता.17) अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता, प्रशासकीय संवर्गातील उपअधिक्षक, कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक,

यांची बदली व पदस्थापना करण्यात आली. सुमारे 785 अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यामध्ये स्थापत्य - 109, विद्युत -17, यांत्रिकी 6 असे एकूण 122, प्रशासन संवर्गातील अधिकारी 4, उपअधिक्षक 43, लिपीक 112, टंकलेखक 274 असे एकूण 433

अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. तसेच शाखा अभियंता (स्थापत्य) 18, उपअधिक्षक 56, वरिष्ठ लिपीक 139 असे एकूण 213, शिक्षण विभागातील उपअधिक्षक 1, वरिष्ठ लिपीक पदस्थापना - 6, लिपीक टंकलेखक बदली - 8 असे एकूण 17 जणांच्या बदल्या करण्यात आल्या. याबरोबरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com