

Pune Cycle Race
esakal
Pune Latest News: पुणे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा (पुणे ग्रँड चॅलेंज टूर) पुण्यात सुरू असून यामध्ये सहभागी झालेल्या देश-परदेशातील नामांकित सायकलपटूंसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन रुग्णवाहिकांसह दोन आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या कालावधीत सायकलपटू व त्यांच्यासाठी असलेल्या इतर मनुष्यबळासाठी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा तत्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.