

पुणे : दिल्ली, चंदीगड, पिंपरी चिंचवडच्या पाठोपाठ आता पुण्यातील रस्त्यांवरही हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशिनद्वारे पाण्याची फवारणी केली जाणार आहे. पाणी फवारणीमुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी महापालिकेने पाच फॉग कॅनॉन मशिन खरेदी केल्या असून शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर त्याचा वापर केला जाणार आहे.