

The annual Rath Yatra concluded with the offering of 56 bhog, Mahaprasad distribution to nearly 20,000 devotees and a cleanliness drive by volunteers.
Sakal
पुणे : ‘जय जगन्नाथ... जय बलराम... जय सुभद्रा...’ या अखंड जयघोषाने रविवारी पुण्याच्या मध्यवर्ती भागात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. हरे कृष्ण महामंत्राच्या गजरात नृत्य करणारे भाविक, रंगीबेरंगी फुलांनी सजलेला भव्य रथ, मार्गभर होणारी पुष्पवृष्टी आणि विविध राज्यातील पारंपरिक वाद्यांच्या निनादाने श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा उत्साहात पार पडला. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), पुणे यांच्या वतीने आयोजित या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते.