
पुणे : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत तळवडे आयटी पार्क सर्वपरिचित आहे. आता चिखली, मोशी व चऱ्होलीतही आयटी पार्क प्रस्तावित आहे. त्यातील चऱ्होली आयटी पार्क उभारणीचे काम खासगी स्वरूपात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खराडी-लोहगाव-चऱ्होली-मोशी-चिखली-तळवडे-निगडी-रावेत-हिंजवडी आयटी पार्क कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी अर्थात तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात चर्चेत आला होता. काही अंशी हा कॉरिडॉर दृष्टिक्षेपात असून, त्याच्या कामाला म्हणावी तशी गती आलेली दिसत नाही.