
पुणे : जगाच्या नकाशाकावर नामांकित असणारी आयटी पार्क पुण्याला लाभली आहेत. हिंजवडी, खराडी, तळवडे, औंध, मगरपट्टा ही केवळ पुण्यातीलच नाही, तर राज्यासह देशातील सर्वाधिक जास्त आर्थिक उलाढाल असलेली आयटी पार्क आहेत. मात्र, येथील आयटी अभियंता, कर्मचारी आणि रहिवासी गेल्या कित्येक वर्षांपासून पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे आपले भविष्य घडविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे येणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी याच प्रश्नांवर आधारित वस्तुस्थिती समोर आणली आहे. प्रशासनाने जागे होऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, हीच अपेक्षा.