

Fadnavis Upholds Jain Community's Trust
Sakal
पुणे : प्रत्येक समाजघटकाचा विश्वास कमावण्यातून भाजपला सातत्याने जनतेचा कौल मिळालेला आहे. त्याला तडा जाणार नाही, याची काळजी पक्ष, नेते आणि कार्यकर्ते सातत्याने घेत असतात. ‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’बाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवला आहे. जैन समाजाच्या भावनांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारी दिली.