पुणे : कैलास स्मशान भूमीतील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे; रिपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inquiry Statement to Commissioner Republican Party of India

पुणे : कैलास स्मशान भूमीतील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे; रिपाई

मुंढवा : ताडीवाला रोड भागातील कैलास स्मशान भूमीत एका मयतावर अंत्यसंस्कार करताना झालेल्या अपघातात ११ जण भाजून जखमी झाले. झालेली दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे निवेदन रिपब्लfकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयुक्तांना दिले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदन रिपाइंचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण व भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड, रिपाई नेते परशुराम वाडेकर आयुक्तांना यांनी दिले. त्यात असे नमुद केले होते की, कैलास स्मशान भूमीत मयतावर अंत्यसंस्कार करत असताना, त्या ठिकाणी मयतावरील पर्यावरणपूर्वक असलेली चिमणी सुरू केली चिमणी मधून वेगाने हवा बाहेर पडली त्याच वेळी अंत्यविधीसाठी आणलेले ज्वलंत पदार्थ एकाच वेळेस टाकल्यामुळे आगीचा भडका उडाला.त्यात ११ जण आगीत होरपळून जखमी झाले.

कैलास स्मशानभूमीची जागा पास्को कंपनीला देण्यात आल्याने तेथे अरुंद जागा निर्माण झाली. या ठिकाणी दुर्घटना झाली, तेव्हा लोकांना सैरावैरा पळत होते. पळताना बाहेर कुठून पडावे ते कळत नव्हते कारण आजूबाजूला पास्को कंपनीने पत्रे लावून जागा पूर्ण ताब्यात घेतल्यामुळे पत्रे लावून ती बंद केली होती. यामुळे जास्त लोक यात भाजले.

पुणे महानगरपालिकेत समशान भूमी मध्ये केव्हाही मयतावर अग्नि लावून अंत्यसंस्कार केले जातात हे माहित असताना तेथे कधीही कुठेही आग विझवण्यासाठी फायर बॉक्स व पाण्याची सुविधा नव्हती तसेच योग्य त्या उपाययोजना पालिकेने केल्या नाहीत. ज्यावेळेस ही दुर्घटना घडली येथे पालिकेचे कर्मचारी उपलब्ध नव्हते. अंत्यविधी ठिकाणच्या चिमणीची मेंटेनेस केलेला नव्हता असे निदर्शनास आले. दुर्घटना झाली तेव्हा पुणे मनपाची अॅम्ब्युलन्स अथवा कोणतेही वाहने उपलब्ध नव्हती.

त्यामुळे यामध्ये पुणे महानगरपालिकेची अपुरी व्यवस्था दुर्घटना होण्यास जबाबदार आहे, म्हणून या सर्व बाबीची चौकशी करावी व दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना पालिकेने मदत करावी अन्यथा येत्या दोन दिवसांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा रिपाइंचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण व भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड, रिपाई नेते परशुराम वाडेकर यांनी दिला. असे निवेदनात नमुद केले होते.

Web Title: Pune Kailas Crematorium Accident Inquiry Statement To Commissioner Republican Party Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top