
कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेडने लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Sambhaji Brigade : कसबा विधानसभा निवडणूक संभाजी ब्रिगेड लढविणार
पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेडने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडच्या शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक संभाजी ब्रिगेड लढविणार आहे. महाविकास आघाडीचा निर्णय काही असला तरी कोणाच्या दबावाला बळी न पडता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे शहराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून उमेदवार जाहीर करतील, असे सांगण्यात आले.
या बैठकीस प्रदेश संघटक संतोष शिंदे, महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, कार्याध्यक्ष अविनाश घोडके, सचिव संदीप कारेकर, सिद्धार्थ कोंढाळकर,अभिजित मोरे, महादेव मातेरे, कुमार पवार, माया पवार, व्यंकट मानपिडी, समाधान घोडके, रणजित लंगर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.