

Shivaji Maharaj
Esakal
पुणे : पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती मंदिरात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. मंदिरातील मुख्य दैवत श्री जयति गजाननाच्या मूर्तीवरील सुमारे ९०० किलो वजनाचे शेंदूर कवच काढून टाकण्यात आले आहे. यामुळे मूर्तीचे मूळ प्राचीन स्वरूप भाविकांना पाहायला मिळाले. मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या प्राथमिक मतानुसार, ही मूर्ती थेट १५व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. ही मूर्ती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची असल्याने तिचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.