

Kasba Ganpati
esakal
Pune Kasba Ganpati Visarjan Delay: पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीला यंदा उशीर झाला. त्यामुळे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने दिलगिरी व्यक्त केली आहे. मंडळाने अधिकृत निवेदन काढून विसर्जन मिरवणुकीसाठी ३० मिनिटं जास्त लागल्याचं मान्य केलं आहे.