

Tragic Kite Flying Accident in Katraj
Sakal
पुणे : पतंग उडविण्यासाठी एका इमारतीत गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा तोल जाऊन सहाव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात ही घटना घडली. अर्धवट बांधकाम केलेल्या इमारतीतील जिन्यास कठडे नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.