Dr. Jabbar Patel : संविधान हाच खरा धर्मग्रंथ; डॉ. जब्बार पटेल

चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्रपरिवार आयोजित गुरुजन गौरव सोहळा संपन्न
Dr. Jabbar Patel
Dr. Jabbar Patelsakal

Dr. Jabbar Patel - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला लोकशाहीचा खरा अर्थ शिकवला. तेच खरे गुरुजन असून त्यांनी देशाला दिलेले संविधान हाच खरा धर्मग्रंथ आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेला संविधानाचे पर्यायाने डॉ. आबेडकरांचे स्मरण करायला हवे, असे मत दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.

चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्रपरिवारांकडून अठराव्या गुरुजन गौरव सोहळ्याचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

Dr. Jabbar Patel
Mumbai Local : पुन्हा सिग्नल यंत्रणेत बिघाड; लोकल सेवा विस्कळीत

पटेल म्हणाले, 'गुरू होणे हे सोपे काम नाही, गुरू म्हणून हा माझा पहिला सत्कार असून आजपर्यंत मी कोणालाही हा माझा शिष्य आहे असे सांगितलेले नाही. गुरू शिष्य परंपरेत शिष्याने कायम गुरूच्या पुढे गेले पाहिजे, याला खरा अर्थ आहे'. यावेळी डॉ. पटेल यांच्यासह माजी आमदार उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ आणि उद्योजक रमणलाल लुंकड यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी अप्पा रेणुसे, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, विशाल तांबे, प्रकाश कदम, युवराज बेलदरे, बाळासाहेब खेडेकर, अभय मांढरे, विजय जगताप, बाळासाहेब धनकवडे, युवराज रेणुसे उपस्थित होते.

उल्हास पवार म्हणाले, आपले आई-वडील आणि त्यांच्याकडून आलेले चांगले संस्कार पदोपदी जपले पाहिजेत. परंतु, अलीकडे मोबाईल नावाच्या यंत्राने घात केला आहे. यामुळे पुढील पिढी निर्बुद्ध होईल का अशी भीती निर्माण होत आहे. यासाठी भेटीगाठी घेऊन संवाद वाढवला पाहिजे. आपण आयुष्यभर प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो.

Dr. Jabbar Patel
Health Tips: सकाळी उपाशी पोटी खा चमचाभर देशी तूप; मिळतील ‘हे’ चमत्कारी फायदे

प्रत्येकाने स्वतःला शिष्य मानलं तर एक दिवस आपण नक्की गुरुस्थानी पोहोचू. डॉ. अडसूळ आणि लुंकड यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत चिंतामणी ज्ञानपीठाचे सन्मानाबद्दल आभार मानले. प्रास्ताविक करताना रेणुसे यांनी गुरू-शिष्य परंपरा पुढील पिढीला समजावी यासाठी या सोहळ्याचे आयोजन करत असल्याचे सांगितले.

डॉ. देविदास शेलार हे सातत्याने आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर चालणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य सेवा करत असतात. त्यांच्या या सेवेची दखल घेत त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर सचिन डिंबळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com