

Entry Fee Hike Proposed at Katraj Zoo
Sakal
पुणे : कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तिकीट दरात सव्वा ते दोन पट वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे सादर केला आहे. प्राणी संग्रहालयाचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढल्याने शुल्कवाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिकीट दरवाढ केली होती.