पुणे : खडकवासला चौपाटीजवळ सुसज्ज वाहनतळाची गरज

वाहतूक कोंडीमुळे स्थानिक व पर्यटक हैराण
शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते.
शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. sakal

किरकटवाडी: खडकवासला, पानशेत व वरसगाव ही धरणे, सिंहगड किल्ला व हिरव्यागार घनदाट जंगलाचा परिसर अशी ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे असल्याने या भागात दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. परिणामी सायंकाळी खडकवासला चौपाटीजवळ मुख्य सिंहगड रस्त्यावर अक्षरशः वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. दिवसेंदिवस ही वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालल्याने पर्यटक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

खडकवासला धरण चौपाटी जवळ अगोदरच रस्ता अरुंद आहे. एका बाजूला वन विभागाची तर दुसऱ्या बाजूला पाटबंधारे विभागाची हद्द आहे. रस्ता रुंदीकरण केवळ वन विभागाच्या जागेतून शक्य आहे परंतु रस्ता रुंदीकरण तर दूरच पण आहे तो रस्ता करण्यासाठी वन विभागाची परवानगी घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाची दमछाक झाली आहे. परिणामी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यातच येणाऱ्या पर्यटकांची हजारो दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त उभी असतात. त्यामुळे वाहनांना ये-जा करणे अवघड होते. अशातच काही बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होते व तासंतास हजारो पर्यटक व स्थानिक नागरिक त्यात अडकून पडतात.

पावसाळ्यात आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्य करणेसुद्धा या वाहतूक कोंडीमुळे अशक्य होणार आहे. त्यामुळे याबाबत उपाय म्हणून चौपाटीला लागून असलेल्या वन विभागाच्या जागेत पर्यटकांसाठी वाहनतळ उभारणे शक्य आहे. तसेच पाटबंधारे विभागाचीही मोठी जागा पडून आहे. त्या जागेवरही वाहनतळ उभा राहू शकतो व त्यातून शासनाला दरमहा लाखो रुपये उत्पन्न सुरू होऊ शकते. तसेच नागरिक व पर्यटकांचीही गैरसोयही दूर होईल.

" वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शासनाने खडकवासला चौपाटीजवळ पार्किंगची सोय करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून शासनाला महसूलही मिळेल. तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही ठराविक जागा ठरवून देणे आवश्यक आहे." संदीप नहार, पर्यटक.

"यापुर्वीही वाहनतळाच्या जागेसाठी वन विभाग व पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत." त्र्यंबक मोकाशी, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष.

"खडकवासला धरण परिसरात शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी असते.या ठिकाणी येणारे पर्यटक हे रस्त्यावर वाहने लावत असल्यामुळे वाहतुक कोंडी होते.या ठिकाणी वाहनतळाची सोय नाही.

हा प्रश्न सोडविण्यासाठी पाटबंधारे विभाग, महानगरपालिका ,वनविभाग यांच्या सहकार्याने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देता येते का याविषयीची पोलीस प्रशासन पाठपुरावा करेल." डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com