Khadakwasla Dam water release today
esakal
पुणे : खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी (ता. ३१) सकाळी ६ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणाच्या (Pune heavy rain dam discharge update) सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग दुपारी १२ वाजता वाढविण्यात येणार असून तो १६,२४७ क्युसेकने वाढवून एकूण २२,८८० क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली.