esakal | खडकवासल्यातून रात्री ८ वाजता होणार 10 हजार क्यूसेकचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasla_Dam

खडकवासल्यातून रात्री ८ वाजता होणार 10 हजार क्यूसेकचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे.

दरम्यान खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, दरम्यान, ''खडकवासला धरणात आज(ता.22) चार वाजेपर्यंत सुमारे ९५ टक्के पाणीसाठा जमा होईल. त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता किमान 2400 क्यूसेक पाणी खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडले जाणार आहे. '' अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पोपट शेलार यांनी सांगितली.

loading image