
पुण्यातील खराडी भागात आज पहाटे 3:20 वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमधील रूम नंबर 102 वर धाड टाकून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 41.35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल, कोकेन आणि गांजा सदृश पदार्थ, 10 मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू आणि बिअरच्या बाटल्या तसेच हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले. खराडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.