

Kharadi Shivane Road Pune Gets Push as PMC Proposes Compulsory Land Acquisition Worth 63 Crore in Vadgaon Sheri
sakal
पुणे : गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून पश्चिम आणि पूर्व पुण्याला जोडणाऱ्या खराडी-शिवणे रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याच्या भूसंपादनात प्रचंड अडथळे आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर झाला आहे. वडगाव शेरी येथे मुळा-मुठा नदीच्या काठाने हा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून जागा उपलब्ध होत नसल्याने सुमारे एक किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. या भागातील जमीन ताब्यात घेण्यासाठी सक्तीचे भूसंपादन केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेला तब्बल ६३.५० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवला आहे.