
रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकास भरधाव दुचाकीने धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पादचाऱ्याला गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे.
दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने पादचाऱ्यास मारहाण करीत खुन
पुणे - रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकास भरधाव दुचाकीने धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पादचाऱ्याला गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना मंगळवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हडपसर मुंढवा रस्त्यावरील साई फर्निचर दुकानासमोर घडली.
अशोक शंकर राव (वय 30, रा. भोईराज सोसायटी, मुंढवा) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सागर शंकर राव (वय 20) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन 20 ते 22 वर्षे वयाच्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे कंपनीमध्ये साफसफाईचे काम करतात. तर त्यांचे मोठे भाऊ अशोक राव हे बिगारी काम करत होते. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते मुंढवा येथे काम शोधण्यासाठी घराबाहेर पडले होते.
दरम्यान, ते रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घरी येत होते. ते हडपसर मुंढवा रस्त्याने मुंढवा येथील साई फर्निचर या दुकानासमोरुन पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच 12 टिबी 4023) त्यांना पाठीमागून जोरात धक्का दिला. त्यावेळी राव यांनी संबंधित दुचाकीस्वारांना त्याचा जाब विचारला. तेव्हा, दुचाकीवरील तरुण व त्यांच्यात वाद सुरु झाले. त्यानंतर तरुणांनी राव यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी जबर मारहाण केल्यामुळे राव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत त्यांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाले. नागरीकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला.
Web Title: Pune Killed After Beingtwo Wheeler
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..