शहरात दोन ठिकाणी तरुणांवर हल्ले

शहरात दोन ठिकाणी तरुणांवर हल्ले
Published on: 

पुणे, ता. ८ : दिवाळीच्या काळात शहरातील कोंढवा आणि येरवडा परिसरात दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही प्रकरणांत लक्ष्मीनगर आणि येवलेवाडी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

कोंढव्यात तरुणावर शस्त्राने वार
कोंढवा बुद्रूक परिसरातील साळवे गार्डनजवळ वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. शुक्रवारी (ता. ६) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. शुभम शरद शिंदे (वय २७, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रतन विठ्ठल खत्री (वय २४), सोमा गायकवाड, पंकज तिवारी आणि आकाश जमादार यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बंटी म्हस्के, समीर विद्यागज, संघर्ष सावंत, शैलेश भंगे, तन्मय सोनवणे यांच्यासह दहा ते बारा जणांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा पानपट्टी चालवितो. आरोपी आणि त्याच्यात पूर्वीपासून वाद होता. शुक्रवारी साळवे गार्डनजवळ आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला.

मद्याच्या वादातून तरुणावर हल्ला
येरवड्यातील मुळा-मुठा नदीपात्रातील चिमा घाट येथे दारू पिताना झालेल्या वादातून तरुणावर फुटलेल्या बाटलीने वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुणाच्या कानाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी अर्जुन दशरथ म्हस्के (वय २४) आणि शादाब जहाँगीर बांगी (वय ३१, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार इस्माईल शेरेकर याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. अक्षय विजय राजुरे (वय २५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे जखमीचे नाव आहे. राजुरे याने लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजुरे आणि आरोपी मित्र आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते चिमा घाट परिसरात दारू पीत होते. त्या वेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी दारूची बाटली फोडून तिच्या तुकड्याने राजुरे याच्यावर वार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.