

पिरंगुट, ता. २६ : पुणे-कोलाड महामार्गावरील पिरंगुट (ता. मुळशी) घाट परिसरात वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने संरक्षक उपाययोजना करण्याची मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधीक्षकांना निवेदन दिले.
आमदार मांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘‘राष्ट्रीय महामार्ग ७६५ वरील पिरंगुट घाटाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. घाटात अनेक ठिकाणी संरक्षक भिंती, सुरक्षा कठडे आणि दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरात या भागात अनेक छोटे-मोठे अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.’’
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न गंभीर बनला असून, भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी घाटात तातडीने संरक्षक भिंती उभारणे, धोकादायक वळणांवर सूचनाफलक लावणे आणि रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मांडेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.