

kondhwa police station
esakal
Pune Latest News: कोंढवा परिसरात दुचाकींवरून आलेल्या गुंड टोळक्याने ‘आम्ही या भागातील भाई आहोत. ‘मकोका’सारख्या गंभीर गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आलो आहोत. आमच्या नादाला लागलात तर खून करू,’ अशी धमकी देत नागरिकांमध्ये दहशत माजवली. या घटनेमुळे महापालिका निवडणुकीच्या काळातही कोंढवा परिसरात सराईत गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचे दिसून येत आहे.