
Burglary at Airking Wine Shop
Sakal
पुणे : कोंढवा परिसरात मागील काही दिवसांत चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. उंड्री- पिसोळी रस्त्यावरील एअरकिंग वाइन शॉपचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड आणि बिअरच्या दोन बाटल्या लांबविल्या. ही घटना १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली.