Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Pune courier boy rape case Update - आरोपीला पुण्यातील कोथरूड-बाणेर परिसरातून अटक करण्यात आली आहे. सुमारे ४८ तासांच्या कठोर परिश्रमानंतर पोलिसांना या प्रकरणात यश मिळाले आहे
Arrested
Arrestedesakal
Updated on

Accused in Pune 'courier boy' rape case arrested - कुरियर बॉय असल्याचा बनाव करून आणि घरात घुसून तरूणीवर भरदिवसा बलात्कार झाल्याची घटना पुण्यातील कोंढवा भागात दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. शिवाय, महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नही निर्माण झाला होता.

या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोंढवा बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. आरोपीला पुण्यातील कोथरूड-बाणेर परिसरातून अटक करण्यात आली आहे. सुमारे ४८ तासांच्या कठोर परिश्रमानंतर पोलिसांना या प्रकरणात यश मिळाले आहे. चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे  पोलिसांनी अटक केलेला तरुण हा संबिधत तरुणीच्या ओळखीचाच निघाला आहे. सध्या पोलिस त्याची आणखी चौकशी करत आहेत.

आरोपीने ज्या तरुणीवर अत्याचार केले, ती तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. ज्यावेळी तरुणीसोबत हा वाईट प्रसंग घडला तेव्हा ती फ्लॅटमध्ये एकटीच होती. तर घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. सोसायटीमध्ये आणि बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Arrested
Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

काय आहे नेमकं प्रकरण? -

पुण्याच्या कोंढवा भागातील एका उंच इमारतीतील सोसायटीमध्ये, आरोपीने स्वतःला 'कुरियर डिलिव्हरी एजंट' म्हणून ओळख करून दिली आणि तरुणीला बँकेशी संबंधित कागदपत्रे देण्याचा बहाणा केला. तक्रारीनुसार, त्याने सही करण्यासाठी पेन मागितला. मुलगी पेन घेण्यासाठी वळताच, तो लगेच फ्लॅटमध्ये घुसला आणि आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. सुमारे एक तासानंतर, म्हणजे रात्री ८:३० वाजता, मुलगी शुद्धीवर आली.

Arrested
Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

पोलिसांना संशय आहे की आरोपीने तिला बेशुद्ध करण्यासाठी काही स्प्रे किंवा रासायनिक पदार्थ वापरला. नंतर असे आढळून आले की आरोपीने तरुणी बेशुद्ध असताना तिच्या फोनवरून सेल्फी काढला आणि फोनमध्ये मेसेज सोडला की त्याने तिचे फोटो काढले आहेत. त्याने धमकी दिली की जर तिने कोणाला सांगितले तर तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. शिवाय, त्याने असेही लिहिले होते की, "मी पुन्हा येईन."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com