esakal | पुण्यातून कोकणात जाणारा मार्ग बंद; ताम्हिणीत कोसळली दरड
sakal

बोलून बातमी शोधा

land-Slide-at-tamhini-ghat.jpg

कोलाड रस्त्यावर तम्हिणी घाटात निवे गावच्या हद्दीत आज सकाळी दरड कोसळली. त्यामुळे कोकणात जाणारी व पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पौड पोलिस, मुळशी आपत्कालीन टीम तसेच महसूल प्रशासन घटनास्थळी तत्काळ पोहोचले आहेत.

पुण्यातून कोकणात जाणारा मार्ग बंद; ताम्हिणीत कोसळली दरड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोलाड रस्त्यावर तम्हिणी घाटात निवे गावच्या हद्दीत आज सकाळी दरड कोसळली. त्यामुळे कोकणात जाणारी व पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पौड पोलिस, मुळशी आपत्कालीन टीम तसेच महसूल प्रशासन घटनास्थळी तत्काळ पोहोचले आहेत.

सलग दोन दिवस पावसाने जोरदार आगमन केल्याने आज सकाळी निवे गावच्या हद्दीत ही दरड कोसळली. त्यामुळे कोकणात जाणार्या प्रवाशांना अडकून पडावे लागले आहे.

पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून रस्त्यावर आलेला राडारोडा हटवण्यासाठी जेसीबी व पोलिस प्रशासनही तत्काळ घटनास्थळी हजर झाल्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. त्यामुळे आज पुण्यातून कोकणात जाणाऱ्या लोकांनी रस्ता पूर्ववत झाल्यानंतरच प्रवास करावा, आणि प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.

loading image
go to top