
आंबेठाण : मुसळधार पावसात पडलेली कोरेगाव खुर्द ( ता.खेड ) येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची संरक्षक भिंत पूर्णत्वास आली आहे. जलसंपदा विभागाने अतितातडीच्या कामात याचा समावेश करून हे काम पूर्ण केले आहे, अशी माहिती शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख यांनी दिली. जलसंपदा विभागाच्या बिगर सिंचन मधून २५५ अंतर्गत या कामाला निधी देण्यात आला असून त्यासाठी जवळपास ३५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.