Bawdhan Protest : बावधनमधील वीज, पाणी, रस्त्यांसाठी ३५० नागरिकांचे 'ह्युमन चेन' आंदोलन; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
Bawdhan Citizens Protest for Amenities : बावधन सिटिझन्स फोरमने बावधनमधील प्रलंबित मुलभूत सुविधा (रस्ते, वाहतूक नियंत्रण, वीज आणि पाणीपुरवठा) आणि अतिक्रमणाविरोधात सुमारे ३५० नागरिकांच्या सहभागाने मानवी साखळी आंदोलन केले असून, मागण्या पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची अंतिम मुदत दिली आहे.
कोथरूड : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आणि मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी बावधन सिटिझन्स फोरमतर्फे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यामध्ये ३५० बावधनकरांचा सहभाग होता.