esakal | Pune : भालेकर चाळीत राहणारी मनाली पवळे झाली CA
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : भालेकर चाळीत राहणारी मनाली पवळे झाली CA

Pune : भालेकर चाळीत राहणारी मनाली पवळे झाली CA

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : एरंडवणा येथील भालेकर या चाळीतील छोट्या घरात राहणारी मनाली संदीप पवळे ही सीए परिक्षेत पुणे विभागात तृतीय आली. पहिल्याच प्रयत्नात तीने मिळविलेल्या या यशाबद्दल समस्त चाळक-यांनी मिठाई वाटप करत आनंदोत्सव साजरा केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही मनालीचे कौतुक करत तीला शुभेच्छा दिल्या.

मनालीचे वडील वीजतंत्री ( इलेक्ट्रीशियन) आहेत तर आई गृहीणी आहे. मनाली म्हणाली की, माझ्या कुटूंबात फारसे शिक्षण घेतलेले कोणी नाही. त्यामुळे मला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांनीच मोठा आनंद व्यक्त केला आहे. मनात जीद्द असेल तर तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच गाठू शकता हे मी माझ्या अनुभवावरुन सांगत आहे. यश मिळाले नाही म्हणून कारणे सांगत बसण्यापेक्षा जिद्द, चिकाटी बाळगून कार्य करत रहा. नक्कीच यश मिळेल.

हेही वाचा: वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

मनालीचे वडील संदीप पवळे म्हणाले की, "मुलगी म्हणजे धनाची पेटी म्हणायचे त्यात काहीही चुक नाही. मुलींना संधी दिली तर त्या संधीचे सोने करतात हे मी अनुभवतो आहे."

loading image
go to top