esakal | Kothrud: मयुर कॉलनी पादचारी उड्डाण पुलावर घाणीचे साम्राज्य
sakal

बोलून बातमी शोधा

मयुर कॉलनी पादचारी उड्डाण पुलावर घाणीचे साम्राज्य

कोथरुड : मयुर कॉलनी पादचारी उड्डाण पुलावर घाणीचे साम्राज्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : मैत्रीणींसह सेल्फी घ्यावा म्हणून या उड्डाणपुलावर जाण्याचे आम्ही ठरवले. उड्डाणपुलावरील पाय-यांवरुन सहज वर गेलो. पण पुलावरील अस्वच्छता पाहून शिसारी आली. पुलावरील लिफ्टच्या दरवाजाजवळ काही पिशव्या, दारुच्या बाटल्या आढळून आल्या. खालील लिफ्टचा दरवाजा पूर्ण उघडा होता. बहुतेक तो दरवाजा कोणीतरी पळवून नेला असावा. कोथरुड मधील मृत्युंजय मंदिरालगत असलेल्या पादचारी उड्डाणपुलाची दुरावस्थेबद्दल बोलताना क्षितीजा होले या युवतीने आपला संताप व्यक्त केला.

क्षितीजा म्हणाली की, लिफ्टच्या आतमध्ये पण बरीच घाण होती. लिफ्ट चालू होती की नाही हे पहायची पण इच्छा राहीली नाही. घाण दुर्गंधीने उलटी येवू लागल्याने आम्ही तेथून काढता पाय घेतला. मृत्यूंजय मंदिराजवळ व रहदारीच्या भागात अशी परिस्थिती असेल तर अवघड आहे. आमचा सेल्फी काढण्याचा प्लॅन फसल्याचे दुःख नाही पण येथील अस्वच्छता व जबाबदार अधिका-यांच्या अकार्यक्षमतेची चीड आली. सार देश स्वच्छ करतच आहात तर एक स्वच्छता अभियान येथे ही राबवा.

मृत्युंजय मंदिर व मयुर कॉलनी येथे कर्वे रस्ता ओलांडणे सोपे जावे म्हणून पादचारी उड्डाण पुल उभारण्यात आला. अपंग व ज्येष्ठांना पाय-या चढून जाणे अवघड होईल म्हणून दोन्ही बाजूला लिफ्टची व्यवस्था करण्यात आली. परंतु कोथरुडचे आयकॉन ठरु शकणारा हा पुल दारुड्यांनी केलेल्या पार्ट्या व लिफ्टमध्ये असलेल्या घाणीमुळे चर्चेत आला आहे. कोथरुड बस स्थानका जवळ आणखी एक पादचारी उड्डाण पुल असून तो सुध्दा बंद आहे. या दोन्ही पुलांचा फारसा वापर होत नसल्याने या

आयडीया इलोव्हेटर्स कंपनीकडे येथील लिफ्टची व सुरक्षा रक्षकांची जबाबदारी होती. फलकावर दिलेल्या नंबरवर सकाळ प्रतिनिधीने संपर्क साधला असता मार्च 2020 पासून आमच्याकडचे हे काम बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे आम्हाला काहीही माहिती नाही असे सांगण्यात आले.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे म्हणाले की, या उड्डाणपुलांचा वापर लोकांनी करायला हवा पण ते करत नाहीत. उड्डाणपुलांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पथ विभागाची असून स्वच्छतेचे काम कोथरुड बावधन व वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे आहे. आरोग्य विभागाला स्वच्छता करण्च्याविषयी सुचना दिलेल्या आहेत.

सारा देश स्वच्छता अभियान राबवण्यात गर्क असताना स्मार्ट पुणे शहरातील कोथरुडच्या पादचारी उड्डाण पुलाची दयनीय अवस्था पाहून मान शरमेने खाली जाते अशी भावना विशाल भेलके या कोथरुडकराने व्यक्त केली.

loading image
go to top