
Pune Latest News: पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील सध्या चर्चेत आहेत. फक्त पोलीस ऑफिसर हीच त्यांची ओळख नसून सौंदर्यस्पर्धेत यश मिळवलेल्या ऑफिसर म्हणून त्यांना ओळखलं जातं. पाटील या सांगलीतील पलूस जवळील पुणदी या गावच्या आहेत. त्यांचे वडील 'महावितरण'मधून निवृत्त असून तर आई गृहिणी आहेत. पाटील 2011 साली पोलीस सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यांनी रनिंग मिसेस इंडिया 2019 हा 'किताब पटकावला आहे. त्यावेळी त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या. त्यांनी गुन्हे शाखा आणि विविध डिपार्टमेंटमध्ये काम केलं असून सध्या पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.