
पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात गुन्हेगारीचा थरार अनुभवायला मिळाला. १७ एप्रिल रोजी भर रस्त्यावर कोयत्याने झालेल्या तुफानी हाणामारीनं नागरिकांची झोप उडवली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला असून, पुणे पोलिसांनी या घटनेतील चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे.