esakal | पुणे : बाळ संगोपन रजेवरील महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

पुणे : बाळ संगोपन रजेवरील महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बाळ संगोपन रजेवर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने धनकवडी परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून या महिलेने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

पूजा दत्तात्रेय कांबळे (वय २८), असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या पुणे ग्रामीण पोलिस दलात काम कार्यरत होत्या. दौंड पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून त्यांची नेमणूक असून सध्या त्या बाळ संगोपन रजेवर होत्या. धनकवडी येथील घरात त्या कुटुंबासमवेत राहात होत्या.

घरातील दुसऱ्या मजल्यावर त्या पतीसह राहात असताना रविवारी (ता.५) रात्री खालील मजल्यावर राहात असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना भेटण्यासाठी आल्या नाही. यामुळे त्यांच्या पतीने दुसऱ्या मजल्यावर येऊन त्यांना आवाज देत दरवाजा वाजवला. मात्र, आतमधून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी पूजा यांनी बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तत्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहकारनगर पोलिस तपास करीत आहेत.

loading image
go to top