पुणे - शहर आणि परिसरात १२ जून रोजी रात्रीपासून भयानक पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि ढगफुटी सदृश पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील औंध, बोपोडी, पाषाण, सूस, महाळुंगे, कोथरूड आणि बावधन या भागांमध्ये गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.