
पुणे : पुणे शहरातील रस्त्यांवर पोलिसांचे अस्तित्व वाढविण्यासाठी व नागरिकांना जलद मदत पुरविण्यासाठी शहर पोलिसांकडून ‘कॉप २४’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. या उपक्रमाचे येत्या १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.