पुणे : बिबट्याने थेट मेढरांच्या कळपावरच घातला घाला; कोलवाडीत पळवले बकरे

जनार्दन दांडगे
बुधवार, 8 जुलै 2020

पुर्व हवेलीमधील कोलवडी, साष्टे व मांजरी खुर्द या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागिल कांही दिवसापासुन बिबट्याचा वावर वाढला असुन, कोलवडी परीसरातुन मंगळवारी (ता. ८) रात्री साडेआठ वाजनेच्या सुमारास मेंढराच्या कळपातील बिबट्याने एक बकरे पळवुन नेले आहे.

लोणी काळभोर (पुणे) : पुर्व हवेलीमधील कोलवडी, साष्टे व मांजरी खुर्द या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागिल कांही दिवसापासुन बिबट्याचा वावर वाढला असुन, कोलवडी परीसरातुन मंगळवारी (ता. ८) रात्री साडेआठ वाजनेच्या सुमारास मेंढराच्या कळपातील बिबट्याने एक बकरे पळवुन नेले आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोलवडी ग्रामपंचायत हद्दीतील भालसिंगवस्ती जवळ एका मोकळ्या जागेत अप्पासाहेब भिसे यांच्या मालकिचा कळप सध्या विसाव्याला आहे. अप्पासाहेब भिसे व त्यांचे कुटुंबिय रात्री साडे आठ वाजनेच्या समारास गप्पा मारत असतांना, कळपाजवळ खेळत असलेल्या बकऱ्यावर अचानक झडप मारुन बिबट्याने बकरे पळवुन नेले आहे. कळपाजवळ आवाज झाल्याने आप्पासाहेब भिसे यांनी बॅटरीचा उजेड आवाज झालेल्या दिशेने मारला असता, पाच फुटाच्या अंतरावरुन बिबट्या बकरे नेत असल्याचे आढळुन आले. 

पुर्व हवेलीत दोन बिबटे असल्याचा संशय...
पुर्व हवेलीमधील आळंदी म्हातोबाची, फुरसुंगी व लोणी काळभोर हद्दीतील डोंगरभागात मागिल सहा महिण्यापासुन बिबट्या आढळुन येत आहेत. यापुर्वी फुरसुंगी व लोणी काळभोर हद्दीत शेतकऱ्यांच्या जनावरांच्यावर हल्ले केल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. मात्र कोलवडी, साष्टे व मांजरी खुर्द या तीन ग्रामपंचायत हद्दीतही बिबट्या फिरत असल्याचे नागरीकांचे म्हणने आहे. त्यास मंगळवारी रात्री पुष्टीही मिळालेली आहे. 

वन विभागाने पिंजरा लावावा- मिलापचंद गायकवाड यांची मागणी
दरम्यान याबाबत बोलतांना यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मिलापचमद गायकवाड म्हणाले, कोलवडी, साष्टे व मांजरी खुर्द या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागिल कांही दिवसापासुन बिबट्या फिरत असल्याच्या चर्चा चालु होत्या. त्यातच मंगळवारूी सहा वाजनेच्या सुमारास बिबट्या आमच्याच शेतात दिसला होता. त्यानंतर तासाभरारच बिबट्याने आप्पासाहेब भिसे यांचे बकरे पळवुन नेले आहे. वरील तीनही गावात बागायती क्षेत्र मोठे असल्याने, शेतकरी रात्रदिवस शेतात असतात. यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरे लाऊन, बिबट्याला पकडण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune : A leopard attack on goat in Kolwadi area