

पुणे, ता. २१ : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात हत्तीरोग निर्मूलनासाठी कंबर कसली असून, बांधकाम कामगार आणि स्थलांतरित मजुरांसाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत रात्रीच्या वेळी रक्ताचे नमुने गोळा करून आजाराचे निदान केले जात आहे.
पुणे महापालिकेने १४ ऑक्टोबरपासून या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. हत्तीरोगाचे परजीवी रात्रीच्या वेळीच मानवी रक्तामध्ये सक्रिय होत असल्याने, अचूक निदानासाठी रात्री ९ ते मध्यरात्री १२ या वेळेत हे नमुने संकलित केले जात आहेत. ही मोहीम प्रामुख्याने शहरातील विविध बांधकाम प्रकल्प आणि मजूर ज्या ठिकाणी रात्री मुक्कामास असतात, अशा स्थळांवर केंद्रित करण्यात आली आहे.
पुणे हे हत्तीरोगासाठी संवेदनशील क्षेत्र नसले तरी शहरात सध्या ७ जुने रुग्ण आहेत. मात्र, ज्या राज्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे, तिथून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मजूर पुण्यात येतात. या मजुरांच्या माध्यमातून शहरात हत्तीरोगाचा स्थानिक प्रसार होऊ नये आणि संसर्ग झालेल्या व्यक्तींची वेळीच ओळख पटवून त्यांच्यावर उपचार व्हावेत, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. शहरातील संसर्ग रोखण्यासाठी बाधित व्यक्तींची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर वेळेत उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेसाठी १२ जणांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.