
पुणे : पुण्यातील लोकलना मुंबईसारखी तुडूंब गर्दी नसली तरी सकाळी व सायंकाळी धावणाऱ्या लोकलचे डबे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. अनेक प्रवाशांना ‘फूट बोर्ड’वर उभे राहून प्रवास करणे भाग पडते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.