
Latest Pune news: पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील रस्त्यांच्या जागा निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रादेशिक आराखड्यानुसार (आरपी) रस्त्यांची आखणी केली जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास आज (ता. १३) स्थायी समितीने मान्यता दिली. या कामासाठी ४१ लाखाचा खर्च येणार आहे.
राज्य सरकारने २०१७ मध्ये ११ गावांचा तर २०२१ मध्ये २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश केला. त्यातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे नुकतीच वगळण्यात आली आहे. सध्या महापालिकेत ३२ गावे आहेत.