ओमिक्रॉनचं संकट: पुण्यात लॉकडाऊन? अजित पवारांनी दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

ओमिक्रॉनचं संकट: पुण्यात लॉकडाऊन? अजितदादांनी दिलं उत्तर

आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आता मास्क नसेल तर पाचशे रुपयांचा दंड होणार आहे. तसेच पालकमंत्र्यांनी शाळांसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, सध्या पुणे जिल्ह्यात 74 टक्के सेंकड डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलायला लावू नका. आज काही निर्णय घेतोय. उर्वरित लोकांनी डोस घेतलाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुढे त्यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत म्हटलंय की, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आणि कोर्पोरेशनबाबत पहिली ते आठवी पर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून नववी-दहावीचे वर्ग चालू राहिल. मात्र, पहिली ते आठवीचे यांचं ऑनलाईन शाळा कामकाज सुरु राहिल. नववी-दहावीचे विद्यार्थी आले पाहिजेत कारण त्यांना लस द्यायची आहे. डी जी भार्गव यांनी देखील सांगितलं की, ही जर परिस्थिती 10 टक्के पॉझिटीव्हीटीची तर तुम्ही निर्णय घ्या. पुणे शहरामध्ये पॉझिटीव्हीटीचा दर 18 टक्क्यापर्यंत गेला आहे. या परिस्थितीतच काळजी करण्याचं कारण बनतं. म्हणूनच काळजीपोटी हे निर्णय घेण्यात येत आहे. पुढील तीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सध्या 105 देशांत आणि भारतातील 23 राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात 11 ठिकाणी सापडले आहेत.

अजित पवार यांनी पुणेकरांना इशारा देत म्हटलंय की, पुणेकरांनी लशीचा दुसरा डोस न घेतल्यास इथून पुढेही कठोर निर्णय घेऊ. इतर देशात एकदम पॉझिटीव्हीटीचा दर वाढलेला दिसून आला आहे. म्हणून आपण 30 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. चार टक्के लसीकरण काल पूर्ण केलंय मुलांचं. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुण्यात आज 1 हजार 104 कोरोनाचे रुग्ण आहेत. सर्व नागरिकांनी थ्री फ्लायर डबल असा चांगला मास्क वापरावा.

पुण्यात असे असतील निर्बंध

  • मास्क नसेल तर 500 रुपये दंड

  • मास्क असताना थुंकला तर 1000 रुपये दंड

  • या नियमांचं तंतोतंत पालन होईलच.

  • दोन लस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. हॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, कुठेही प्रवेश मिळणार नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
loading image
go to top