
पुणे : लोहगाव विमानतळ होणार प्रशस्त; अखेर मिळाली १३ एकर जागा
पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळ आला संरक्षण खात्याची 13 एकर जागा मिळाल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी रात्री केली. यामुळे पुण्यातील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या रखडलेल्या प्रकल्पाला वेग मिळणार आहे.
हवाई दलाने 13 एकर जागा दिल्यामुळे त्यांना देशातील अन्य शहरात तेरा एकर जागा देणे किंवा त्या जागेच्या किमतीची रक्कम देणे असा तोडगा निघाला आहे. हवाई दलाने तो मान्य केल्याची माहिती गडकरी यांना आज दिली. गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला हा प्रस्ताव अखेर मार्गी लागला. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांच्या त्याबाबत वारंवार बैठका झाल्या होत्या.
हेही वाचा: Katraj Dairy Election: ९१ उमेदवारांपैकी १० जणांची रिंगणातून माघार
लोहगाव विमानतळावर सध्या 10 विमाने उभी राहतील, एवढी क्षमता आहे, त्यात आता भरघोस वाढ होईल 13 एकर जागेतील 2.5 एकर जागा कार्गोसाठी वापरता येणार, प्रवाशांची ये-जा करण्याची ही क्षमता वाढेल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवसिंग, लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
अशी असेल पुढची वाटचाल
डिफेन्स इस्टेट आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांची आता संयुक्त बैठक होईल. त्या बैठकीतून जागा विमानतळाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया ठरेल. त्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण सुधारित आराखडा तयार करेल आणि निविदा काढून कामाला प्रारंभ होईल.
पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया आता वेगाने पुढे जाईल. अनेक वर्षे रखडलेला हा प्रस्ताव मार्गी लागल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण नितीन गडकरी यांचे आभार मानत आहे.
- संतोष ढोके (संचालक, लोहगाव विमानतळ)
Web Title: Pune Lohgaon Airport Getting 13 Acer Land
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..