Vehicle Owners Frustrated at Pune Lok Adalat
पुणे : नोटीस पाठविलेल्या प्रकरणांबरोबर स्वत:हून दंडाची रक्कम भरणाऱ्या वाहनचालकांची मोठी गर्दी शनिवारी न्यायालयात उसळली. त्यामुळे, परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. स्वतःहून दंड भरायला तयार असतानाही पोलिस दंड भरून घेत नाही व सवलत देत नाही, असा त्रागा नागरिकांनी व्यक्त केला. तसेच मागील लोकअदालतीत टोकन दिलेल्या वाहनचालकांचे देखील दंड स्वीकारण्यात आले नाहीत.