Pune Loksabha : जिल्ह्यात ‘मविआ’ला बळ

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्ह्यात दमदार कामगिरी बजावली आहे.
Pune Loksabha
Pune Loksabhasakal

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्ह्यात दमदार कामगिरी बजावली आहे. काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला बळ देणारा हा निकाल ठरणार आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाच आमदारांपैकी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते, आमदार चेतन तुपे या चार आमदारांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला, तर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार या दोन लोकप्रतिनिधींनी शरद पवार यांच्याबरोबर थांबण्याचा धाडसी निर्णय घेतला.

पक्षाच्या नावावरून तसेच चिन्हावरून निवडणूक आयोगाचा निर्णय अजित पवार यांच्या बाजूने लागल्याने राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले. शरद पवार यांना नवीन नाव, तसेच निवडणुकीच्या तोंडावरच ‘तुतारी वाजवणारा माणूस ’हे नवखे चिन्ह मिळाले. अशाही परिस्थितीत जुन्नर, आंबेगाव, खेड व हडपसर, भोसरी मतदारसंघांत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोणीही मोठा नेता नसतानाही केवळ मोजक्या कार्यकर्त्यांच्या जिवावर यश मिळविले.

सहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या मिळालेल्या साथीच्या जोरावर कोल्हे यांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय या मतदारसंघात काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी उभारी देणारा व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com