Pune Lok Sabha: पर्वती विधानसभेतून महायुतीला भरघोस मताधिक्याची अपेक्षा, मात्र धंगेकरांची होती तगडी फिल्डींग

Pune Lok Sabha: एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदासंघावर भाजपने जम बसविला. यंदा पर्वतीमधून मताधिक्य मिळविण्यासाठी धंगेकर यांनी नेटाने प्रयत्न केले.
Pune Lok Sabha
Pune Lok Sabhaesakal

Pune Lok Sabha:

पुणे लोकसभा निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पर्वती विधानसभा मतदारसंघाकडून भाजप महायुतीला मताधिक्याच्या अपेक्षा आहेत, तर येथे मुसंडी मारू, असा विश्वास महाविकास आघाडीला आहे.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना ६७ हजार, तर विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांना ३७ हजारांचे मताधिक्य होते. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून ५५.४७ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून ५३.०७ टक्के मतदान झाले होते. गेल्या वेळेपेक्षा यंदा मतांची संख्या ७ हजार ७३९ ने वाढली आहे.

या मतदारसंघात एकूण ३ लाख ४१ हजार ५५ मतदार असून, यंदा १ लाख ८९ हजार १८४ मतदान झाले. येथील झोपडपट्ट्यांतील लोकसंख्येचे प्रमाण सुमारे ४५ टक्के आहे, तर वस्ती भाग आणि गृहरचना संस्था एकूण ५५ टक्के आहेत. या मतदारसंघातून महापालिकेत सुमारे २५ नगरसेवक होते. त्यात भाजपचे २० जण होते.

मतदारसंघातील तळजाई, जनता वसाहत, दांडेकर पूल, दत्तवाडी, पानमळा, सिंहगड रस्त्यावरील महादेवनगर, आंबेडकरनगर, प्रेमनगर, गुलटेकडीतील इंदिरा वसाहत या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी व्होट बॅंक आहे, तर काही प्रमाणात भाजप-शिवसेनेचाही त्यात हिस्सा आहे. गृहरचना सोसायट्यांच्या तुलनेत मतदानासाठी याच भागातून उत्साह असल्याचे दिसून आले.

साने गुरुजीनगर येथील महापालिका वसाहत, शिवदर्शन, पर्वती दर्शन, महर्षीनगर, बिबवेवाडी गावठाण, लक्ष्मीनगर आदी भागातही मतदारांची संख्या मोठी असून, तेथेही मतदान मोठ्या प्रमाणात झाले. या परिसरात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना तसेच रिपब्लिकन पक्ष यांचे चांगले पॉकेट आहे, तर गृहरचना संस्थांचीही मोठी संख्या असून, त्यात जैन, माहेश्वरी, ब्राह्मण, मराठा आदी समाजांचे प्राबल्य आहे. त्यात भाजपला मानणारा वर्ग मोठा आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदासंघावर भाजपने जम बसविला. यंदा पर्वतीमधून मताधिक्य मिळविण्यासाठी धंगेकर यांनी नेटाने प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी वस्तीभागावर लक्ष केंद्रित केले. या भागात व्यापाऱ्यांचे वास्तव्य असून, त्यांचा व्यवसाय शहरात म्हणजेच कसबा मतदारसंघात आहे. त्यांच्याशीही धंगेकर यांनी संपर्क वाढविला. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन मिसाळ यांनीही प्रचाराची व्याप्ती घटक पक्षांच्या मदतीने सर्वदूर वाढविली. त्यामुळेच महायुतीच्या या मतदारसंघात अपेक्षा वाढल्या आहेत, तर झोपडपट्टी आणि वस्ती भागाच्या जोरावर महाविकास आघाडीला येथे मताधिक्याचा विश्वास आहे.

Pune Lok Sabha
SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

महत्त्वाचे असे काही

पर्वती विधानसभा भाजपच्या ताब्यात. आमदारांची तिसरी टर्म

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे

याच भागात वास्तव्य

वस्तीभागावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी व्होट बँक

व्यापाऱ्यांवर कोणाची भिस्त राहणार?

Pune Lok Sabha
lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com